मला उमगत नाही प्रेम म्हणजे नक्की काय असतं
तुझं सेम असतं कि माझं सेम असतं
एकतर्फी प्रेम हाेतं
कधी तुला हाेतं
कधी मलाही हाेतं
तुझं Attraction असतं
कि माझं Attraction असतं
हे दाेघांना समजण्याआधीच प्रेम वाटू लागतं
आधी मित्र झालाे एकमेकांच्या सवयीचे झालाे
तु मला आेळखतेस
मी तुला आेळखताे
चालता,बाेलता,भेटता कधी न भेटता
मनातलं सगळच मला सांगतेस
मीही सगळं ऐकून घेताे
तुला समजावण्याचं धाडस करताे..
तुझा एकटेपणा कमी करता करता
मी मात्र एकटा पडताे
एकतर्फी प्रेमाची हीच का ती सुरूवात
म्हणून ही मी बैचेन हाेताे
तुला काय वाटतं माझ्याबद्दल
मला काय वाटतं तुझ्याबद्दल
हेच रात्रभर चाचपडत बसताे
भल्या सकाळी आवरून सावरून बाहेर पडताे
तुला भेटून सगळं सागावं का?
हा प्रश्न घेवून हिंडत फिरताे
धाडस हाेत नाही म्हणून
मदयाचा एक घाेट घेताे
एक – दाेन घाेट पाेटात उतरल्यावर
सिंहासारखा डरकाळी फाेडताे
आता..
आता तुझा नंबर डायरीमधून काढताे
तुला फाेन करायला वेडयासारखा वागू पाहताे
एकदा रिंग वाजून कट करताे
सिंह झालेलाे मी एका रिंगमध्येच
पळताभुई थाेडी हाेताे
मग तिचा फाेन येताे
कट का केलास म्हणून विचारल्यावर
मी ही खाेटं बाेलू पाहताे
खाेटं मी ही बाेलताे
खाेटं ती ही बाेलते
दोघांना ही माहित असून
आधी तू आधी मी करत करत
काहीच नाही असं म्हणून टाळा टाळ करू पाहताे
आता मनातले बाेल बाेलून टाक
रंगमंचाची भूमिका किती वेळ रंगवणार
आता भूमिकेचा पडदा पाडून टाक
चेहऱ्यावरचा रंग पुसून टाक
मूळ भूमिकेत येवून प्रेमाची कबुली माग
तिचा हाेकार येताच आयुष्याला आकार देवून टाक
बघ आता तुला उमगतय का प्रेम म्हणजे नक्की काय…
.
.
- प्रमा
२७/०५/२०२०

